T.F.R.H.

12
आपल्याला ठरवता येत नाही
आपला काळ.
रहाता येत नाही अपडेट.
चालता येत नाही ह्यांच्या बरोबरीने.
शीला की जवानी म्हणत म्हणत
थिरकत नाहीत आपले पाय,
मुन्नीच्या गाण्यावर.
तरी जमवत अस्तो सगळया कसरती. 
जमतात असं दाखवण्यापुरतं तरी.
तुडवावाच लागतो हा चीखल.
हसावचं लागतं रजनीकांतवरच्या
प्रत्येक एसेमेसला.
हया भ्रमीष्टांसमोर
वाचायचा नस्तो कुठलाच
जाहीरनामा.
एक दिवस असा येईल म्हणत
आळवायची नस्ते अरुणची कवीता.
वाजावायचा नस्तो कुठलाच
बिगूल, स्व:ताच्या विचारांचा.
ज्याने समोरचा उध्वस्त होईल.
त्याला जपावं लागतं
मोबाईलच्या रिंगटोन मध्ये.
त्याचा फोटो लावून.

T.F.R.H.No. २


पुढे गेलेल्यांची चाल
आपल्याला आवडत नाही.
सापडत नाही आपलीच लय.
आपण करतो नुस्ताच गुंता,
आपल्याच हातांनी काळाच्या दोराचा.
आणी परत गुदमरतो आपलाच श्वास,
आपल्या - आपल्या म्हणवणार्‍यांच्या 
गांडू गर्दीत
कुणाच्या स्तनांवरची थंडी
दुधाच्या सायीसारखी
ओठांनी टिपता आली म्हणजे
किंवा
कुणाची छातीच लपेटून घेतली स्वत:भोवती
सबंध सारंगी पिसार्‍यासारखी,
आणी उधळून टाकलं सर्वस्व,
त्यांच्या स्तनाग्रांवर जांभूळ छटा असलेल्या
बेमालूम अगदी फकिरासारखं
किंवा
कुणाच्या दातांमधल्या पिवळया उन्हांत
गुंतवून घेतलं स्वत:ला,
सार्‍या जाणीवांसकट
किंवा
पावसाळी संध्याकाळी एखादया,
अर्धा एक तास एकाच छत्रीखाली
एकाच दगडावर बसून,
एकमेकांची उब वाटून घेवून
नंतर
पिऊन टाकला अख्खा पाऊस
एकमेकांच्या देहावरचा.
हपापल्या अधाशीपणाने.
ओठांपासून बेंबीपर्यंत किंवा
कपाळापासून मांडयांपर्यंत किंवा
स्तनांपासून शिश्नापर्यंत किंवा
मेंदूपासून मेंदूपर्यंत किंवा
एकमेकांपासून एकमेकांपर्यंत.
तरी
तरी सांगता येत नाही कुठल्याच ऋतूवर
आपला अधिकार…....

                             _सशांठाकूर  

tales from rabbit hole....

.
..
...

26
सर्वस्व उधळावं आणी
पागल व्हावं आपल्यासाठी कुणीही,
अशा स्वप्नांचा गर्भपात
करावाच लागतो,
आपल्याच हातांनी.
स्वत:ची मशाल करुन
चाचपडून घ्यावं लागतं
स्वत:लाच अधून मधून.
मी आहे मी आहे
म्हणणार्‍या गांधील माशा
पप्पी घेतात तेव्हा.
आणी सांगावं लागतं,
मी राहीन मी राहीन,
धरुन पकडून आणावं
लागतं स्वत:ला,
छिनाल भावनांच्या प्रदेशातून. 
चवचाल असते दुनिया,
बेताल अस्ते दुनिया.
चाल मे इसके तु चाल मिलाले,
ताल मे इसके तु ताल मिलाले.
इस सिमेंट मे जान है,
चुटकीभर तो खाले.
गोलगोल फिरुन जागेवर
खालीपिली बकवास.
आपल्याला बाहेर पडता येत नाही
आपणच रचलेल्या
चक्रव्यूवहातून.
डोळे फोडून घेतले तरी
विश्वास बसत नाही
ते जे दाखवतात
त्याच्यावर ...............

                                _सशां .

सर्फ़ा सर्फी सुरु असते

सर्फ़ा सर्फी सुरु असते 
जगाच्या एका कोनाड्यात बसून कुठेतरी
विचारांचीच फक्त प्रसवाप्रसव आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण 
कुणीतरी twitalela असत - rip दाभोळकर 
आणि समोरच्या ५ २ इंच flat स्क्रीन वर धावत असतात सगळ्या च्यानेल चे रंगीबेरंगी flat तोंडाचे माईक पोटतिडकीने actually  पोटाच्या तिडकीने 
आणि आपण लायका लायकी करत बसतो लायकी नसताना copyright चे ठोकळे ठोकून सगळीकडे
 …. a who was that guy...? पुरोगामी महाराष्ट्राची मान १ ५ ० वर्ष अजून खाली घालून कुणीतरी एन्ड्रोईडतो whatsup पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ? 
राजकारणी - मेडिया रंगपंचमी सुरु झालेली 
profile pic चेंज करून निषेध नोंदवूया - मित्राचा आव्हाहन 
जाऊ द्या हो बरेच दाभोळकर मरत असतात आज ग्रहण आहे म्हणे …. मग राखी कधी बांधूया ? 
आपण फक्त मागच्या पानावरून पुढच्या पानावर एवढीच उडी मारू शकतो …

आज की रात फिर




रात जब सोने की कोशीश मे

आँखे उब जाती है गीन गीन यादों के तारे

और कानों पर तुम्हांरी हसी की उंगलीया

जमा लेती है अपने आप कब्जा

मै चाहकर भी सुन नही पाता रात की लोरी

तुम्हांरी गोद मे जो सुन सकता था मै जब चाहू

तुम्हें गाली देकर खुदको बदनाम कर लीया”,

कहती है मेरी नींदे मुझसे

आज की रात फिर

मुझेही सुनानी होगी  लोरी मेरी नींदोंको….



मुंबै दिनांक :- मा / न्सु / न

डाव्या बाजूला ह्रदयाच्या थोsssडूसं वर,
जिथून सुरवात होते
माझ्या कवीतेची,
तू, माझ्यावर लीही,  

असा हट्ट केलास की.
मी लिहीतो तुझ्यावरच,
.
.
.
.
.
मी लिहीतो तुझ्यावरच,
फक्त अनुभवता येणाऱ्या ओळी.
जिथे माझे ओठ थांबतात बेभान
पुढच्या प्रदेशात उतरण्याआधी
जो करतो मेंदूचा गूंता.
मी कोसळतो त्या चटका लावणाऱ्या
तुझ्या छातीवर उभ्या असलेल्या
ठीपक्या पासून.
नी माझं होतं लहान मूल उपाशी.
मग धड चालताही येत नाही मला
तूझ्या आधाराशीवाय.

काय होऊन भीडतो मी तूला?
काय होऊन देतेस सारं काही, दरवेळी?
तूझ्या ह्र्दयाला एक छिद्र,
माझ्यापण.
पण तूझं वेगळं माझं वेगळं.
मला हसवू नकोस मरेन मी.






त्यापेक्षा तोल गेलेला बरा....

अ- तूझ्या घरात माझा पसारा नको तीतका वाढलाय,
      ठेवता ही येत नाही  टाकता ही येत नाही.
ब- कुठून आणला? कुठे घेवुन जायचाय?
अ- माहित नाही.
ब- कशाचाच कशाशी मेळ नाही.
अ- जुनाच खेळ नव्याने, आपापल्या पद्धतीने
      माहित नसतांना खेळत आलो सारेच.
ब- सवय होते हळू हळू ...   
अ- सार्‍याचीच,  हे वाईट.
      कसले कसले आवाज भरून राहीलेत खोलीभर
      आणी वास सुद्धा...
ब- बाहेर तरी काये वेगळं...?
अ- नळ उघडा राहीला, नकळत नळाच्या..
ब- काय काय वाहून गेल? कुठे वाहून गेलं?
अ- काय माहीत...
ब- म्हणजे पुन्हा तिथेच आलो सारं फिरून .
अ- बाकी मी पुरता चिंब चिंब झालो तुझ्या
      घरातला माझा पसारा आवरता आवरता...
      पुन्हा सावरता येईल की नाही हा प्रश्न आहेचये..
      प्रश्नांचा तोल जातो सारखा सारखा
      उत्तरांचा टेकूच नाही सापडत
      नाहीतरी कसले कसले पुचाट टेकू देवून
      आयूष्याचा डोलारा सांभाळायचा म्हणा....
      त्यापेक्षा तोल गेलेला बरा....