मुंबै : दिनांक :- मुंबै-बिंबई,लोकल-बिकल , पाट्या -बिट्या ,टी -शर्ट-बीशर्ट... वगैरे वगैरे सगळंच.

परवाचा हॅन्गओव्हर अजूनहि अधून-मधून,
अजून प्या कच्ची.
१००% हार्डकोअर ,
नोबडी ईज परफेक्ट आयएम नोबडी,
लूजर - बीच,
द हेल वॉज फूल सो एम बॅक,
दूवाओसे बीगडे काम बनते है – शीलाई मशीन,
समस्या दो समाधान लो,
मेरे पास आईये गंजापन भूल जाईये,
भायंदर मे भगंदर का सस्ता ईलाज,
औरत से होगा औरत का ईलाज,
मरीन लाईनला छत्र्यांचा कोलाज,
यू कॅन ब्लिंक नाऊ,
शिर्डीवाले साईबाबा - पु ढी ल स्टेशन दादर,अगला स्टेशन दादर, नेक्स्ट स्टेशन दादर,
६०/६० रुपये मे बीइंग ह्यूमन,
मी अण्णा हजारे आहे च्या टोप्या एकदम गायब,
बीलॉंगींगचा अतीशय कंटाळा येतो…
म्याव म्याव म्याव म्याव,
रीश्ते वहि सोच नई स्टार प्लस प्लस प्लस प्लस,
वन ईज नॉट ईनफ,
बोकुल्या आयएम ट्राइंग ना,
मला कीस हवाय आत्ता…
मला तु्झ्या कुशीत यावंसं वाटतय…,
आय नेव्हर सीन अ ऐस लाईक दॅट,
डॉईंग  डॉईंग  डॉईंग…
बघतोस काय मुजरा कर,
भाईसाब थोडा एडजस्ट करलो ना..
करलो करलो करलो
करा मग तीच्या माय…
तुम्ही  मला अर्ज  द्या मी तुम्हांला नोकरी  देतो…
द्या द्या द्या द्या,
मी दादरकर- मी अमूककर- मी तमूककर
कर कर कर कर.
पाट्या लावा – पाट्या पाट्या पाट्या,
झेंडे  लावा – झेंडे झेंडे झेंडे ,
तुम्ही काहीही म्हणा
करावचं लागतं सगळं,
करा करा करा करा.
मरायचचये एक दिवस,
मरा मरा मरा मरा……

मुंबै : दिनांक :- मुंबै-बिंबई,लोकल-बिकल , पाट्या -बिट्या ,टी -शर्ट-बीशर्ट... वगैरे वगैरे सगळंच.

सचिन ठाकूर ....

मुंबै : दिनांक - पा / ऊ / स .



आठवणी झिरपून यावा 
मौनाला गंधित गहिवर 
मी अबोल, धूप अन दिवा 
अंधार नाचतो नदीवर...

देहाला स्पर्श डसतो
  तू दिलास झांजर वेळी 
 हा चंद्र कलेतून चळतो
       तू अंधाराची पांघर चोळी....


मुंबै : दिनांक - पा / ऊ / स .

सचिन ठाकूर.