"टेल्स फ्रॉम रेबीट होल"


दिवसांच्या रीकाम्या खिशात
खुळखूळवतो आपण, पैसे सोडून
सर्व काही.
समाजबिमाज, प्रेमबिम, माणूसबिणूस,
फिलॉसोफीबिलॉसोफी, राजकारणाबिजकारण,
पोएट्रीबिएट्री, क्लासीकलबिसीकल...
संध्याकाळची वाट बघत.
आणी संध्याकाळी
सोपवतो स्वत:ला,
मेंदू कुरतडणा़र्‍या
हजार अद्रुश्य छिनाल चेहर्‍यांना.
मीटलेच डोळे. लागलीच जर झोप,
तर आईबापाचे चेहरे उपटतात एकदम,
पॉप अप करत.
"Some viruses can not be deleted..."
आणी  Re-boot करावं लागतं स्वत:ला.

                              _स.शां.ठाकूर

 

2 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. श्वास घेतोय याची जाणिव असेपर्यंत सगळ कही ठीक असत. आणि नंतर........हा हा हा.

    ReplyDelete