T.F.R.H.No. २


पुढे गेलेल्यांची चाल
आपल्याला आवडत नाही.
सापडत नाही आपलीच लय.
आपण करतो नुस्ताच गुंता,
आपल्याच हातांनी काळाच्या दोराचा.
आणी परत गुदमरतो आपलाच श्वास,
आपल्या - आपल्या म्हणवणार्‍यांच्या 
गांडू गर्दीत
कुणाच्या स्तनांवरची थंडी
दुधाच्या सायीसारखी
ओठांनी टिपता आली म्हणजे
किंवा
कुणाची छातीच लपेटून घेतली स्वत:भोवती
सबंध सारंगी पिसार्‍यासारखी,
आणी उधळून टाकलं सर्वस्व,
त्यांच्या स्तनाग्रांवर जांभूळ छटा असलेल्या
बेमालूम अगदी फकिरासारखं
किंवा
कुणाच्या दातांमधल्या पिवळया उन्हांत
गुंतवून घेतलं स्वत:ला,
सार्‍या जाणीवांसकट
किंवा
पावसाळी संध्याकाळी एखादया,
अर्धा एक तास एकाच छत्रीखाली
एकाच दगडावर बसून,
एकमेकांची उब वाटून घेवून
नंतर
पिऊन टाकला अख्खा पाऊस
एकमेकांच्या देहावरचा.
हपापल्या अधाशीपणाने.
ओठांपासून बेंबीपर्यंत किंवा
कपाळापासून मांडयांपर्यंत किंवा
स्तनांपासून शिश्नापर्यंत किंवा
मेंदूपासून मेंदूपर्यंत किंवा
एकमेकांपासून एकमेकांपर्यंत.
तरी
तरी सांगता येत नाही कुठल्याच ऋतूवर
आपला अधिकार…....

                             _सशांठाकूर  

1 comment:

  1. तुला कोण ऋतूंवर अधिकार दाखविणारे दिसले माहित नाही...त्यांच्यावर कोणाचाच अधिकार नसतो..आपल्याकडे सगळ असल तरी आपण समाधानी नसतो आणि नसल तरी हेच रडगान असत...कारण आपण दुसऱ्यासोबत आपली तुलना करतो...तुझ हि हेच..

    ReplyDelete