ब्रेथलेस

  आता तर कधीही जाग येते. आपण झोपेत असल्याचे भास होतात, अनाहूतपणे अगदी. दचकायला होतं. शंभरदा.
गेलेल्या सगळया दिवसांचे तुकडे स्लो मोशनमध्ये कुणीतरी ऍनीमेट केल्यासारखे एकमेकांना चिकटतात नी वेगवेगळे आकार तयार करतात. विचीत्रपणे. एकदमच मोठे मोठे होत जातात, फुटतात, आपटतात, ताणले जातात, रांगायला लागतात, छातीवरचे केस कुरवाळतात, नाचायला लागतात, रडायला लागतात आणी त्यांच्या डोळयांतून असंख्य अळया बाहेर पडतात. बॅकग्राऊंडला तीच्या गळयातून निघणारा हळू हळू बदलणारा आणी वाढत जाणारा आवाज. कधी अचानक घश्यातच अडकणारा. कधी? मग पाठीवर फिरणाऱ्या तीच्या हातांच्या बोटांना हजार धारदार नखं फुटतात एकदम आणी अख्खी पाठ सोलून काढतात. घरभर पसरलेला संभोग. ओलसर झालेल्या भींती. धाप टाकत वर खाली होणारं छत. ब्रेथलेस. ब्रेथलेस शरिरं. ब्रेथलेस मन. ब्रेथलेस झोप. अख्खं घर माझ्यासकट हलायला लागतं.