कित्येक रात्री जागून बरबाद
वर्षांमध्ये जमा होत जात निमूटपणे
डोळयांचा गुन्हा नसतांना ते पहात
हरवताहेत ( कित्येक रात्रींपासून )
मुकाट डोळयां देखत
ते शहर आपलं आपलं वाटायला
लागण्याच्या भासात
कुणीतरी पाय कलम करून जसे काही
आपण नव्या शहरात उगवायला तयार
जीथे काही सुद्धा उगवत नाही
ओंगाळवाण्या चेहऱ्यांशीवाय
लाजीरवाण्या भुकेशीवाय
वगैरे वगैरे….
तु असतीस सोबत तर
कदाचीत
विसरताही आली असती
तुझी सोबत…….
मुंबै – दिनांक – अ / स / चं
No comments:
Post a Comment