मुंबै: दिनांक : प्र-श्न


मुंबै: दिनांक : प्र-श्न

2 comments:

  1. प्रसंग - एक

    आता तू बसली असशील
    त्याची उघडी पाठ बघत
    निळ्या अंधारात
    रडावस वाटेल तुला पण
    थांब रडू नकोस .
    कुशीत घेताना त्याने,
    तुला भरून येइलही एकवेळ
    पण रीतं होण्याची `सम'
    तुला माहितीये तू कुठे विसरलीयेस ते.
    वादळ शमल्यावर देहांच
    तू तुझ्या आत बघशील
    तुला काहीही शिल्लक दिसणार नाही.
    त्याची फिरालेली पाठ बघताना
    निळ्या ढगांचा थवा उतरताना दिसेल
    त्याचा पाठीवर
    तू बोटं फिरवशिलही
    पण कुठलीच नक्षी उतरणार नाही,
    झोपेच्या प्रयत्नात तुझी रात्र उतरेल,
    ओसरेल तुझ्यावरून....


    प्रसंग - दोन

    सकाळी दारावरची बेल वाजते. रेश्मा पातेल घेउन दार उघडते.
    नुकताच झोपेतून उठलेला टवटवित चेहरा पाहून
    भैया खुश होतो. आज एक तारीख आहे हे विसरून परत जातो.
    त्याच्या मनात एक प्रश्न घुटमळतो...
    ``बिन नहाये फूल खिला है , क्या नहाये चाँद खिलेगा ..?''

    ReplyDelete