मुम्बै दिनांक :- रिपीट / टेलीकास्ट / ...


स्थलांतरित झाल्यापासून
स्थिरतेचे गाणे गाताच आले नाही...
वाहनांच्या पार्श्वसंगीतात सुरु होणारा
आणि इमारतीनी बहरलेल्या आकाशात
आपल्यासाठी एक जागा शोधणाऱ्या
डोळ्यात मिटणारा दिवस...
पायांची लय विस्कटून टाकणारा रस्ता,
आणि लक्षात न राहणारी चेहररयाची रहदारी ....
रात्री-झोपताना-सकाळी-संध्याकाळी-वेळी-अवेळी
आठवतो तुझा चेहरा त्याच्या प्रश्नासकट-``सगळ काहि ठीक असताना पायाची भिंगरी झाल्याची स्वप्न तुला का पडतात..?''
माझ तुला उत्तर भिंगरी सारख ....
पण कधीतरी मी थकेन
तेव्हा परत येवून फक्त  एकदाच
तुझ्या कुशीत मनसोक्त
झोपेन म्हणतो..........................................!!!




मुम्बै दिनांक :- रिपीट / टेलीकास्ट  / ...

...सशाठाकुर 

ह्या दिशा पाहून ठेव 
सारे प्रहर भोगुन घे 
पुन्हा एकदा 
माझ्या सोबत तू जगलीस कधी ...? 
तुला... आठवत ... 
 माझ्या पुरत म्हणशील तर
इथले  सगळे बहर 
अंगावर नाचविल्याशिवाय  मी 
 इथून जाणार नाहि... 

मुम्बै - तारीख - रिश्ते ....,

``पानी की सतेह पर चलते
सारे ही रिश्ते ....,
ना साहिल की चाह..,
नाही डूबने का खौफ....
                    ....सशाठाकुर...   '' 





मुम्बै - तारीख -