'मी'...???


'मी' आहे सर्वज्ञ
वैश्विक शहाणपणाने बहरलेला

'मी' आलोय जिंकून सर्वच
सत्याचे प्रयोग अधाशीपणाने

सर्व ज्ञान गंगांचा माझ्यातच उगम होतो
माझ्यातच मिळण्यासाठी

'मी' रोज लिहितो महाभारत माझे
संध्याकाळी टरा टरा फाडण्यासाठी

'मी' आहे इतका दया क्षमाशील शांतिप्रिय की
मला दिसत नाही काही माझ्याशिवाय

'मी' करतो रोज विश्वाच्या रहस्यांचे डिसेक्शन
झोपण्यापूर्वी बासरी वाजवता वाजवता

'मी' बांधून टाकलेत बुद्ध बिद्ध कबीर बीबीर
माझ्या fb इंस्टा च्या दावणीला

'मी' उमटू देत नाही माझ्यावर
माणूसपणाचे शहारे सुद्धा

'मी' आहे समाधिस्त निद्रिस्त मदमस्त
माझ्या स्मार्टफोन मध्ये व्यस्त

'मी' आता अनंतकाळ फिरणार आहे
गोल गोल या अनंतात
( डेटा पॅक संपला तरी ☺️😊😊😊)

From today's improvisation : ‘मी’ To ‘मी’ :  व्हाया  Steve jobs # Mark zuckerberg # Sundar pichai वगैरे वगैरे  …

( खूप मजा आली आज, अजून बरीच versions झालीत पण माझ्या टायपिंगच्या  कंटाळा मुळे नंतर परत कधीतरी 😊😊😊)

@ sashathakur

"कंफेशन ऑफ डेंजरस (सुलेमानी) माईंड"


( कुणाचं काय तर कुणाचं काय )
तुझ्या छातीवरची कमळे म्हणे डोक्यात...
( तर मग तू कमळी, अनूषंगाने माझ्या देहाचा चिखल )
आणी दारुच्या अमंलात
माझे लिखाणातले प्रयोग.
कोण कोणाला घेवून चाललयं?
माहीत नाही.
दारु मला – मूळीच नाही.
मी दारुला – कसं शक्य आहे?
तर बाहेर बॉम्बस्पोटातून वाचलेल्यांची हळहळ.
छातीत माझ्या नुसतीच जळजळ
लिखाणातला गणपती आला आणी नाचून गेला.
तर म्हणे मागे जलेबी बाई नाचत होती,
राउंड राउंड एण्ड स्टॉप, राउंड राउंड एण्ड स्टॉप,
गोल फिरुन परत जागेवर.
वर्तुळच वर्तुळं.
मी : तूझी बेंबी मला आवडते,
तर तीथे लव नाहीच जणू तर.. रत.
असू दे मला नाहीतरी नाहीच आवडत – ती
मग एवढं जंगल घेवून हिंडतेस ते? – मी
तू का हरवतोस त्यात..? – ती
तुझ्यातलं दुसरं काही सापडेपर्यंत मी तीथेच हरवणार.. – मी
-तर तीच्याकडे त्याच्यापलीकडे फक्त ती होती.
म्हणून मी मेलो.
तर बाकीचे च्यूत्या म्हणाले.
रात्र चढत जातांना आपल्याला चढायला काहीच नाही !
-तर म्हणाले दादरला थर्ड फ्लोर चालेल का..?
मी म्हणालो, एवढुसं...? कुणीही चढेल.
-तर म्हणाले थोडा वेळ दया स्वत:साठी मेडीटेशन वगैरे करा.
-तर मेसचे डबे किती दिवस वाट बघणारेत आपली – माहीत नाही.
तीकडे घरच्यांचा बी.पी केव्हाही कधीही वर खाली होतो,
नी शुगर खो-खो खेळते.  
तर इकडे आपल्या खिशांना फक्त
पैशांचे स्वप्न पडतात.
आणी प्रोडयूसर म्हणतो गंभीर नको कॉमेडी लीहा.
-तर आपल्याकडे काजूच्या काय लसणाच्यापण बागा नाहीत.
मग चहा टपरीवाला परवडला – ती
वाढता वाढता पाच वर्षात महागाई इतकी वाढली का ? – मी
तर ती सपोर्ट सपोर्ट म्हणून वीव्हळली.
आपला वीक पॉईंट.
मग तीने तीच्या अश्रूंनी तीचा प्रदेश इरीगेट करुन टाकला आख्खा.
तर तीथे तुझ्याच नावाची बाग फुललीये ती म्हणाली.
मग मी परत भुंगा.
तर बाकीचे म्हणाले सुलेमानी सुलेमानी...  
तर वेटर पीटर बील घेवून उभा
कुणाचं काय तर कुणाचं काय....  

                         निमित्त १२ जून

                           _सचिन ठाकूर 

ब्रेथलेस

  आता तर कधीही जाग येते. आपण झोपेत असल्याचे भास होतात, अनाहूतपणे अगदी. दचकायला होतं. शंभरदा.
गेलेल्या सगळया दिवसांचे तुकडे स्लो मोशनमध्ये कुणीतरी ऍनीमेट केल्यासारखे एकमेकांना चिकटतात नी वेगवेगळे आकार तयार करतात. विचीत्रपणे. एकदमच मोठे मोठे होत जातात, फुटतात, आपटतात, ताणले जातात, रांगायला लागतात, छातीवरचे केस कुरवाळतात, नाचायला लागतात, रडायला लागतात आणी त्यांच्या डोळयांतून असंख्य अळया बाहेर पडतात. बॅकग्राऊंडला तीच्या गळयातून निघणारा हळू हळू बदलणारा आणी वाढत जाणारा आवाज. कधी अचानक घश्यातच अडकणारा. कधी? मग पाठीवर फिरणाऱ्या तीच्या हातांच्या बोटांना हजार धारदार नखं फुटतात एकदम आणी अख्खी पाठ सोलून काढतात. घरभर पसरलेला संभोग. ओलसर झालेल्या भींती. धाप टाकत वर खाली होणारं छत. ब्रेथलेस. ब्रेथलेस शरिरं. ब्रेथलेस मन. ब्रेथलेस झोप. अख्खं घर माझ्यासकट हलायला लागतं.

"टेल्स फ्रॉम रेबीट होल"


दिवसांच्या रीकाम्या खिशात
खुळखूळवतो आपण, पैसे सोडून
सर्व काही.
समाजबिमाज, प्रेमबिम, माणूसबिणूस,
फिलॉसोफीबिलॉसोफी, राजकारणाबिजकारण,
पोएट्रीबिएट्री, क्लासीकलबिसीकल...
संध्याकाळची वाट बघत.
आणी संध्याकाळी
सोपवतो स्वत:ला,
मेंदू कुरतडणा़र्‍या
हजार अद्रुश्य छिनाल चेहर्‍यांना.
मीटलेच डोळे. लागलीच जर झोप,
तर आईबापाचे चेहरे उपटतात एकदम,
पॉप अप करत.
"Some viruses can not be deleted..."
आणी  Re-boot करावं लागतं स्वत:ला.

                              _स.शां.ठाकूर

 

T.F.R.H.

12
आपल्याला ठरवता येत नाही
आपला काळ.
रहाता येत नाही अपडेट.
चालता येत नाही ह्यांच्या बरोबरीने.
शीला की जवानी म्हणत म्हणत
थिरकत नाहीत आपले पाय,
मुन्नीच्या गाण्यावर.
तरी जमवत अस्तो सगळया कसरती. 
जमतात असं दाखवण्यापुरतं तरी.
तुडवावाच लागतो हा चीखल.
हसावचं लागतं रजनीकांतवरच्या
प्रत्येक एसेमेसला.
हया भ्रमीष्टांसमोर
वाचायचा नस्तो कुठलाच
जाहीरनामा.
एक दिवस असा येईल म्हणत
आळवायची नस्ते अरुणची कवीता.
वाजावायचा नस्तो कुठलाच
बिगूल, स्व:ताच्या विचारांचा.
ज्याने समोरचा उध्वस्त होईल.
त्याला जपावं लागतं
मोबाईलच्या रिंगटोन मध्ये.
त्याचा फोटो लावून.

T.F.R.H.No. २


पुढे गेलेल्यांची चाल
आपल्याला आवडत नाही.
सापडत नाही आपलीच लय.
आपण करतो नुस्ताच गुंता,
आपल्याच हातांनी काळाच्या दोराचा.
आणी परत गुदमरतो आपलाच श्वास,
आपल्या - आपल्या म्हणवणार्‍यांच्या 
गांडू गर्दीत
कुणाच्या स्तनांवरची थंडी
दुधाच्या सायीसारखी
ओठांनी टिपता आली म्हणजे
किंवा
कुणाची छातीच लपेटून घेतली स्वत:भोवती
सबंध सारंगी पिसार्‍यासारखी,
आणी उधळून टाकलं सर्वस्व,
त्यांच्या स्तनाग्रांवर जांभूळ छटा असलेल्या
बेमालूम अगदी फकिरासारखं
किंवा
कुणाच्या दातांमधल्या पिवळया उन्हांत
गुंतवून घेतलं स्वत:ला,
सार्‍या जाणीवांसकट
किंवा
पावसाळी संध्याकाळी एखादया,
अर्धा एक तास एकाच छत्रीखाली
एकाच दगडावर बसून,
एकमेकांची उब वाटून घेवून
नंतर
पिऊन टाकला अख्खा पाऊस
एकमेकांच्या देहावरचा.
हपापल्या अधाशीपणाने.
ओठांपासून बेंबीपर्यंत किंवा
कपाळापासून मांडयांपर्यंत किंवा
स्तनांपासून शिश्नापर्यंत किंवा
मेंदूपासून मेंदूपर्यंत किंवा
एकमेकांपासून एकमेकांपर्यंत.
तरी
तरी सांगता येत नाही कुठल्याच ऋतूवर
आपला अधिकार…....

                             _सशांठाकूर  

tales from rabbit hole....

.
..
...

26
सर्वस्व उधळावं आणी
पागल व्हावं आपल्यासाठी कुणीही,
अशा स्वप्नांचा गर्भपात
करावाच लागतो,
आपल्याच हातांनी.
स्वत:ची मशाल करुन
चाचपडून घ्यावं लागतं
स्वत:लाच अधून मधून.
मी आहे मी आहे
म्हणणार्‍या गांधील माशा
पप्पी घेतात तेव्हा.
आणी सांगावं लागतं,
मी राहीन मी राहीन,
धरुन पकडून आणावं
लागतं स्वत:ला,
छिनाल भावनांच्या प्रदेशातून. 
चवचाल असते दुनिया,
बेताल अस्ते दुनिया.
चाल मे इसके तु चाल मिलाले,
ताल मे इसके तु ताल मिलाले.
इस सिमेंट मे जान है,
चुटकीभर तो खाले.
गोलगोल फिरुन जागेवर
खालीपिली बकवास.
आपल्याला बाहेर पडता येत नाही
आपणच रचलेल्या
चक्रव्यूवहातून.
डोळे फोडून घेतले तरी
विश्वास बसत नाही
ते जे दाखवतात
त्याच्यावर ...............

                                _सशां .