"कंफेशन ऑफ डेंजरस (सुलेमानी) माईंड"


( कुणाचं काय तर कुणाचं काय )
तुझ्या छातीवरची कमळे म्हणे डोक्यात...
( तर मग तू कमळी, अनूषंगाने माझ्या देहाचा चिखल )
आणी दारुच्या अमंलात
माझे लिखाणातले प्रयोग.
कोण कोणाला घेवून चाललयं?
माहीत नाही.
दारु मला – मूळीच नाही.
मी दारुला – कसं शक्य आहे?
तर बाहेर बॉम्बस्पोटातून वाचलेल्यांची हळहळ.
छातीत माझ्या नुसतीच जळजळ
लिखाणातला गणपती आला आणी नाचून गेला.
तर म्हणे मागे जलेबी बाई नाचत होती,
राउंड राउंड एण्ड स्टॉप, राउंड राउंड एण्ड स्टॉप,
गोल फिरुन परत जागेवर.
वर्तुळच वर्तुळं.
मी : तूझी बेंबी मला आवडते,
तर तीथे लव नाहीच जणू तर.. रत.
असू दे मला नाहीतरी नाहीच आवडत – ती
मग एवढं जंगल घेवून हिंडतेस ते? – मी
तू का हरवतोस त्यात..? – ती
तुझ्यातलं दुसरं काही सापडेपर्यंत मी तीथेच हरवणार.. – मी
-तर तीच्याकडे त्याच्यापलीकडे फक्त ती होती.
म्हणून मी मेलो.
तर बाकीचे च्यूत्या म्हणाले.
रात्र चढत जातांना आपल्याला चढायला काहीच नाही !
-तर म्हणाले दादरला थर्ड फ्लोर चालेल का..?
मी म्हणालो, एवढुसं...? कुणीही चढेल.
-तर म्हणाले थोडा वेळ दया स्वत:साठी मेडीटेशन वगैरे करा.
-तर मेसचे डबे किती दिवस वाट बघणारेत आपली – माहीत नाही.
तीकडे घरच्यांचा बी.पी केव्हाही कधीही वर खाली होतो,
नी शुगर खो-खो खेळते.  
तर इकडे आपल्या खिशांना फक्त
पैशांचे स्वप्न पडतात.
आणी प्रोडयूसर म्हणतो गंभीर नको कॉमेडी लीहा.
-तर आपल्याकडे काजूच्या काय लसणाच्यापण बागा नाहीत.
मग चहा टपरीवाला परवडला – ती
वाढता वाढता पाच वर्षात महागाई इतकी वाढली का ? – मी
तर ती सपोर्ट सपोर्ट म्हणून वीव्हळली.
आपला वीक पॉईंट.
मग तीने तीच्या अश्रूंनी तीचा प्रदेश इरीगेट करुन टाकला आख्खा.
तर तीथे तुझ्याच नावाची बाग फुललीये ती म्हणाली.
मग मी परत भुंगा.
तर बाकीचे म्हणाले सुलेमानी सुलेमानी...  
तर वेटर पीटर बील घेवून उभा
कुणाचं काय तर कुणाचं काय....  

                         निमित्त १२ जून

                           _सचिन ठाकूर 

No comments:

Post a Comment