``अजिबात रडायचं नाही, तुला माहितीये ना मला आवडत नाही रडलेलं.'' - तो.
तिची मान तिने इकडची तिकडे केली.
``सारखं आपलं रडरडीला आतुर, कशाला ना?'' - तो.
ती गप्प.
``डोळे मिट, हं आता उलटे अंक मोज, जाईल हळूच.'' - तो.
ती गप्प.
``आणि एकाच वेळी दोघांनी नको असं वागायला. तो अजून चार महिने ऐकणार नाही.निदान तू तरी.. .'' - तो.
ती गप्प.
`` तुला कंटाला आला का? सारखं बालगंधर्वांच्या पोस्टरकडे बघून बघून?'' - तो.
ती गप्प.
``चल दुसरीकडे जाऊ. मी तुला पावसाचं गाणं शिकवतो. इथे ट्राफिकचा आवाज आहे .'' - तो.
'' नको मला कामं आहेत, मी जाते.'' - ती.
तिने प्लाझाच्या कठड्यावरून कबुतर खाण्याच्या दिशेने उडी मारली एकदम.
तो तिच्या पंखांच्या ठीपक्यांकडे पाहत राहिला.
आणी.....
.
.
.
.
.
.
.....पाऊस मोठा झाला.........
मुंबै दिनांक ... ... ... पाउस ....
सचिन ठाकूर
तिची मान तिने इकडची तिकडे केली.
``सारखं आपलं रडरडीला आतुर, कशाला ना?'' - तो.
ती गप्प.
``डोळे मिट, हं आता उलटे अंक मोज, जाईल हळूच.'' - तो.
ती गप्प.
``आणि एकाच वेळी दोघांनी नको असं वागायला. तो अजून चार महिने ऐकणार नाही.निदान तू तरी.. .'' - तो.
ती गप्प.
`` तुला कंटाला आला का? सारखं बालगंधर्वांच्या पोस्टरकडे बघून बघून?'' - तो.
ती गप्प.
`` तुला सुबोध आवडायला लागलाय का? दाखवला असता तुला सिनेमा पण ते घेणार नाहीत ना आपल्याला आत ''
ती गप्प.``चल दुसरीकडे जाऊ. मी तुला पावसाचं गाणं शिकवतो. इथे ट्राफिकचा आवाज आहे .'' - तो.
'' नको मला कामं आहेत, मी जाते.'' - ती.
तिने प्लाझाच्या कठड्यावरून कबुतर खाण्याच्या दिशेने उडी मारली एकदम.
तो तिच्या पंखांच्या ठीपक्यांकडे पाहत राहिला.
आणी.....
.
.
.
.
.
.
.....पाऊस मोठा झाला.........
मुंबै दिनांक ... ... ... पाउस ....
सचिन ठाकूर
Mumbai Dinank .... Paus... koslat raho! :)
ReplyDelete