मुंबै, दिनांक : पा/ ऊ/ स .

- आणि मग तू  एकदा अचानक हातात `चिरीमिरी' ठेवलस.
पाऊस आला.... मोठा ...
च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ ...
मग तू ओठही दिलेस. 
आणि आपण पाऊस वाटून घेतला.
थेंब न थेंब...
माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही.
मग मीच सांडलो. 
कणाकणांनी तुझ्या ओंजळीत.
-तर म्हणे ते.....
तुझ्या शरीराचा किनारा करत माझं गलबत बुडू दिलं त्यात.


तर पुन्हा तू पुखराज घेवून आडवी झालीस .
`` कहां छुपा दि हैं रात तुने 
कहां छुपाये हैं तुने अपने गुलाबी हाथोके थंडे फाये 
कहां हैं तेरे लबो के चेहरे 
कहां हैं तू आज- तू कहां हैं ?
ये मेरे बिस्तर पे कैसा सन्नाटा सो रहा हैं ?''

ए,तुझ्या गल्लीत पाऊस कोसळतोय का? आत्ता?
कि पारवे एकमेकांच्या पंखात चोची खुपसून 
उसवतायेत एकमेकांना ..?
नी तुला ते बघवत नाहीये...
कि उगाचच श्वासांच्या गरम
प्रदक्षिणा सुरु झाल्यात..? आज आणि काल अशी दोन टोकं धरून..?

माझ्या खिडकीच्या बाहेर पाऊस कोसळतोय पण
मला त्याचं दुसरं टोकच सापडतं नाहीये.
नी खिडकीतल्या खिडकीत गलबत नुसतंच डूचमळतय.

एकदम कुठुनतरी दिव्याचा प्रकाश पडला आणि 
माझा पाऊस नागडा दिसायला लागला ...
.


.
.
मुंबै, दिनांक : पा/ ऊ/ स .

- सचिन ठाकूर.

1 comment:

  1. अचानक रस्त्यावरून चालता चालता
    पाऊस मला आडवा आला,
    म्हणाला, मुंबई वरून कोसळत येतोय.
    सोबत कविता घेऊन आला होता...
    मी म्हणालो याचे काय करू तर म्हणाला,
    माझ्या नागड्या देहासाठी
    सचिनने विणलंय हे तलम कापड
    आणि मला अंग झाकायची सवय नाही...
    तेव्हा तू जमल्यास याचं काहीतरी कर...
    मी म्हंटले, ठीक आहे तू बस पाठीवर,
    थकला असशील,
    तुला तुझ्या मुक्कामी सोडतो.
    मग त्याला क्षितिजावर
    एक पाळणा बांधून दिला
    तुझ्या कवितांच्या कापडाचा...
    तो त्यात निवांत पहुडलाय...
    आणि जाग आल्यावर
    तो तुझ्याच कवितांतून पाझरेल
    असे त्याने वचन दिलंय मला !
    मी म्हंटले त्याला
    मग माझ्या कवितांचे काय
    तर तो फक्त हसला
    आणि हलकेच वीज चमकून गेली त्याच्या गालांवरून...

    ReplyDelete